संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
गेली तीस वर्ष कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेले कर्मचारी मुरारी जोशी यांची डोंबिवली पश्चिम येथील “ह” प्रभाग क्षेत्रातील कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून पालिकेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला. डोंबिवली पश्चिम भागामध्ये हा प्रभाग अंतर्गत असून या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे आणि उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवीन असे यावेळी मुरारी जोशी यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.
त्याचप्रमाणे डोंबिवली पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी धुळीचे साम्राज्य आहे. हा प्रभाग धुळ मुक्त करण्याचा आपला मानस असून आपल्याला कमी कालावधी मिळालेला असला तरी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन. असा निर्धार जोशी यांनी व्यक्त केला आहे. अनधिकृत विभाग, फेरीवाला पथक प्रमुख आणि वरिष्ठ लिपिक म्हणून मुरारी जोशी यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेमध्ये काम केले आहे. स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे , पुंडलिक म्हात्रे, सहाय्यक आयुक्त साबळे, लाल बावटा रिक्षा यांचे अध्यक्ष कॉम्रेड काळु कोमास्कर तसेच अनेक मान्यवरांनी सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरारी जोशी यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.