प्रतिनिधी: अवधुत सावंत
चोरीला गेलेले व २ महिन्यांपेक्षा जास्त काळ हरवलेला मोबाइल शोधताना तांत्रिक विश्लेषणातून गुन्हे शाखेच्या कक्षास मोलाची माहिती अशी प्राप्त झाली कि आय-क्लाउड अकाउंट डिलीट करणे सहजा सहजी शक्य नसल्यामुळे आय फोन चोरी करून, इ क्लाउड वरील अकॉउंट व इतर माहिती सॉफ्टवेअर द्वारे डिलीट करून ते फोन ग्राहकांना पुन्हा विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्याप्रमाणे चोरीच्या मोबाईलचे आय क्लाउड अकाउंट आणि इतर माहिती डिलीट करणाऱ्या संशयित्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली.
अंधेरी येथील बॉनी प्लाझा शॉपिंग सेंटर या दुकानात काही इसम चोरीचे अँड्रॉइड फोन फॉरमॅट करणे आणि आय क्लाउड अकाऊंट डिलीट करण्यासाठी येणार असल्याचो माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून या दोनही इसमांना आणि दुकान मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तपास केला. या टोळीच्या म्होरक्याकडे विविध राज्यातील चोरी केलेले फोन जमा होतात आणि ते सर्व फोन बोनी प्लाझा येथे आणले जातात. यातील एक आरोपीं सॉफ्टवेअरच्या मदतीने सर्व अँड्रॉइड फोन फॉरमॅट करतो तसेच परदेशातील हॅकर्सच्या मदतीने आय क्लाउड अकाऊंट डिलीट करतो.
या इसमांकडून ७० चोरीचे मोबाइल, हार्ड डिस्क, फॉरमॅट करण्याकरता लागणारे विविध कंपन्यांचे डोंगल, विविध कंपन्यांचे सिम कार्ड असा ₹.९,१३,६०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.