Latest News गुन्हे जगत

API सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन वेळा बदली?

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात चर्चेत असणारा विषय मनसुख हिरेन प्रकरण यामध्ये API सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी भाजप पक्षाकडून होत होती. याच दरम्यान सभागृहात गृहमंत्र्यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. मात्र आज सचिन वाझे यांची बदली केली गेली आहे. वाझे यांची बदली क्राईम वरून मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात करण्यात आली होती. मात्र, पुन्हा तेथूनही सचिन वाझे यांची पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत (Special Branch) मध्ये बदली करण्यात आल्याचे समजते.

सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोन वेळा बदली करण्यात आली आहे. (SB-1) अर्थात विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली. मात्र असे असले तरी ते पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्रामध्ये सेवेत राहतील. यावरुन त्यांना कोणते अधिकारी पाठिशी घालत आहेत. अशी चर्चा होता असताना पाहायला मिळते.

दरम्यान, अंबानी यांच्या घरासमोर मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास API सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या कारचा मालक मनसूख हिरेन याचा मृत्यू झाल्यानंतर सचिन वाझे हे अडचणीत सापडले आहेत. याशिवाय मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवरच आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणीही केली जात होती.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *