संपादक: मोईन सय्यद / मीरा भाईंदर प्रतिनिधी:
मीरा भाईंदर शहरातील कोविड रुग्णांच्या मदतीसाठी मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस पक्षा तर्फे हेल्पलाईनची सुरुवात 02 मे पासून करण्यात येत आहे. या करिता गरजू नागरिकांनी http://www.mirabhayandercongress.com या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मुजफ्फर हुसैन यांचे तर्फे करण्यात आले आहे.
मुजफ्फर हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व नगरसेवकांना रुग्णांच्या मदतीसाठी मिरा भाईंदर काँग्रेस मुख्य कार्यालय, नयानागर येथे संपर्कात राहून कोविड रुग्णांच्या मदतीसाठी आवश्यक त्या सर्व उपयोजना करावयाचे निर्देश देण्यात आले आहेत. या करीता ६ वेगवेगळ्या स्लॉटमध्ये कार्यकर्त्यांची टीम मुख्य कार्यालयात उपस्थित राहणार असून नागरिकांच्या गरजेनुसार ICU बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याकरीता सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑक्सिजन बेडची उपलब्धतता, हॉस्पिटलच्या वाढीव बिला संबंधित तक्रारी, रुग्णवाहिका, ब्लड आणि प्लाझमा, अंत्यविधी करीता सहकार्य करणे अश्या विविध स्थरावरती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्य करणे आवश्यक असून मीरा भाईंदर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसेन यांनी केले आहे.
नागरिकांच्या मदती करीता संपर्क क्र.:
8655434000
9920222024