संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाभयंकर कोरोना काळातील सन २०२० – २०२१ या वर्षात ही दरवर्षी प्रमाणे पोलीस दलातील उत्कृष्ठ व चोख कामगिरी बाजवणारे पोलीस अधिकारी, हवालदार, नाईक यांना त्यांनी केलेली कामगिरी म्हणून त्यांचे मनोबल उंचावण्याकरिता गौरवण्यात येते.
संजू जॉन
यावर्षी देखील पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर अंतर्गत कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ चे कणखर, प्रामाणिक व धडाकेबाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट डिटेक्शन नेटवर्क चा हातखंडा असल्यामुळे डोंबिवली-कल्याण मधील बरेचसे गुन्हे २४ तासात उखरून काढणारे त्यांच्या टीम मधील पोलीस हवालदार दत्ताराम निळकंठ भोसले व पोलीस नाईक प्रकाश जगन्नाथ पाटील यांची यंदा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा “पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई” यांचे सन्मानचिन्ह (पदक) व प्रशस्तीपत्र प्राप्तकर्ता म्हणून निवड झाली आहे.
दत्ता भोसले
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले असून, त्यनिमित्ताने दरवर्षी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना त्यांनी पोलीस दलात केलेल्या गुणवत्ता सेवा, अत्यंत बिकट परस्थितीमध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे, जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा उंचविणे इ. गुणवत्तादार सेवेबद्दल केलेल्या कर्तव्याचा विचार करून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व जिल्ह्यातील पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, विशेष शाखा इ. विभागातून गुणवत्तेच्या आधारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची निवड होऊन त्यांना दरवर्षी ‘१ मे महाराष्ट्र दिनी’ महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च समजला जाणारा सन्मानांचा ‘पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई’ यांचे सन्मानचिन्ह (पदक) व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येतो.
प्रकाश पाटील
त्याप्रमाणे सन २०२०-२०२१ या वर्षात पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर अंतर्गत ठाणे गुन्हे शाखा कल्याण युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, पोलीस हवालदार दत्ताराम निळकंठ भोसले, पोलीस नाईक प्रकाश जगन्नाथ पाटील यांची महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च समजला जाणारा सन्मानाचा पुरस्कार ‘पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई’ यांचे सन्मानचिन्ह (पदक) व प्रशस्तीपत्र प्राप्तकर्ता म्हणून निवड करून गौरविण्यात आले.
ही निवड झाल्याबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय येणपुरे यांनी या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.