संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
वयोवृद्ध लोकांना जाणूनबुजून धक्का देऊन वाद निर्माण करून त्यांच्या वरच्या खिशातील महागडे मोबाईल ची जबरी चोरी करणाऱ्या दोन जणांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात असताना स्विमिंग पूल, एम.जी.रोड, कांदिवली (प) येथे एका अज्ञात इसमाने त्यांना मागून येऊन धक्का मारला व त्यांच्याशी वाद सुरु केला. त्यावेळी त्या इसमाचा जोडीदार हा देखील त्यांच्यामध्ये शामिल होऊन फिर्यादी यांच्याशी वाद सुरु करून त्यांच्या गळ्यात हात टाकून वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल चोरी करून पळून गेले असल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून कच्चा रस्ता मालवणी येथून दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ११ मोबाईल किंमत अंदाजे रु.१,६५,०००/- हस्तगत करण्यात आले आहेत. आणि सदर दोघांना अटक करण्यात आली आहे.