Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

क्राईम ब्रँच युनिट-३ च्या पोलिसांनी ६ महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.२१.११.२०२१ रोजी तक्रारदार नामे सुरेंद्र देवेंद्र नायक (वय: ४२ वर्षे) हे त्याच्या ‘सुजाता पान शॉप’ मध्ये बसले असताना इनोवा गाडीमधून आलेल्या दोन इसमांनी पत्रकार असल्याचे सांगून “तू गुटखा विक्री करतोस म्हणून पोलीसांना सांगून तुझ्यावर कारवाई करतो” असा दमदाटी करून जबरीने दुकानाच्या गल्ल्यातील रूपये १५,०००/- रोख रक्कम घेत दरोडा टाकून जबरीने चोरून नेली. त्याबाबत टिळकनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्र. १८५/२१ भादवि. कलम ३९२,५०६,४५२ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील पाहिजे असलेला फरार आरोपी सुधाकर पांडुरंग उत्तेकर (वय: ४२ वर्षे) हा मागील ६ महिन्यापासून फरार असून मिळुन येत नव्हता.

आज दिनांक १६.०५.२०२२ रोजी पोना १११८ सचिन वानखेडे यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यावरून क्राईम ब्रँच युनिट-३ घटकातील अधिकारी व अंमलदार यांनी तोतया पत्रकार व गुन्हातील पाहिजे असलेला आरोपी सुधाकर पांडुरंग उत्तेकर (वय: ४२ वर्षे) रा. २०१, समर्थ कृपा, रवी पाटील मैदानाजवळ, डोंबिवली (पूर्व) यास ताब्यात घेतले. सदर आरोपी मिळून आल्याने त्याची वैदकीय तपासणी करून टिळकनगर पो. ठाणे येथे बंदिस्त केले आहे.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.जयराम मोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रावराणे, पीएसआय. मोहन कळमकर, पीएसआय. कवडे, पोना. सचिन वानखेडे, पोना. साबळे पोह. शिंदे, पोशि. शेकडे, पोना. कडु यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

प्रसिद्धी माध्यमांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर आरोपी हे खरोखर पत्रकार आहेत का ? व त्याने तोतया पत्रकार बनून याआधी असे किती दरोडे टाकुन गुन्हे केले आहेत याची पुढील तपास व कारवाई टिळक नगर पोलीस स्टेशनचे सपोनि. रवींद्र कौराती करत आहेत.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *