मुंबई: कोकण वृत्तसेवेचे पत्रकार निसार अली सफदर अली सय्यद यांना राज्याचे मंत्री व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जागृत महाराष्ट्र या मराठी वृत्तवहिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिना निमित्त दिनांक 15 मे रोजी मालाड पश्चिमेतील ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट शोध पत्रकारितासाठी ज्येष्ठ पत्रकार निसार अली सफदर अली सय्यद यांना मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी पालिका पी-उत्तर विभागाच्या माजी प्रभाग अध्यक्षा नगरसेविका संगीता सुतार यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
पत्रकार निसार अली सय्यद यांना यापूर्वी देखील पत्रकारितेसाठी अनेक संस्था संघटनांच्या वतीने सन्मानित करण्यात आलं आहे. सामाजिक क्षेत्रात ही राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ही सन्मानित करण्यात आले. निसार अली यांनी जागृत महाराष्ट्र वृत्त वाहिनेचे संचालक अमोल भालेराव व त्यांच्या टीमचे आभार मानले आहे.