संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने आगरी वधू-वर मेळावा डोंबिवली येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर प्रांगणात आज नुकताच संपन्न झाला. या परिचय मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प प्रकाश महाराज, प्रथम महापौर आरती मोकल, ऍड. तुप्ती पाटील, ठाण्याचे मा. नगरसेवक रमाकांत पाटील, माजी सभापती चद्रकांत पाटील, काळू कोमास्कर, शरद पाटील, बाळासाहेब खारीक, दत्ता वझे, ह.भ.प हनुमान पाटील, इत्यादी मान्यवर या वधू-वर मेळाव्यास उपस्थित होते.
गावांचा विकास झाल्यामुळे आगरी समाजातील अनेकांचे स्थलांतर झाले आहे. लोक एकमेकांना भेटत नाहीत. विवाह जुळणे कठीण बाब झाली आहे. असे ह.भ.प प्रकाश महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले. बहुसंख्य भूमिपुत्र समाज जमीन विकून उध्वस्त झाला आहे. परिणामी त्याची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे मुलांची लग्न करण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागत आहे. अश्या समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला असल्याचे सगळ्या मान्यवर वक्त्यानी सांगितले.
तर, ऍडव्होकेट तृप्ती पाटील म्हणाल्या कि, आगरी समाजातील तरुण-तरुणींना स्टेजवर जाण्यासाठी संकोच वाटतो. तो दूर व्हावा यासाठी येथे वधू-वरांचा परिचय मेळावा आयोजित केला आहे. मागील वर्षी आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला होता. यंदा देखील आमदार राजू पाटील यांनी प्रत्येक जोडप्याला प्रोत्साहन पर भेट म्हणून प्रति जोडपे एक लाख रुपये देण्याची ग्वाही केली आहे. आगरी समाजात ही एक प्रकारची क्रांती आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मंगळ ग्रह शुभ आहे. त्याची भीती बाळगु नका. मध्यस्थी करणारे फसवणूक करतात. त्यास आळा बसावा यासाठी या परिचय मेळाव्याचे आणि वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले. या मेळाव्यात दोनशे तरूण-तरुणी सहभागी झाले होते. अशी माहिती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजक काळू कोमास्कर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.