संपादक: मोईन सय्यद/मिरा
-भाईंदर प्रतिनिधी
भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विसर्जन स्थळांसोबत निर्माण करण्यात आलेल्या 3 कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव/समुद्रात आणि मुर्ती स्वीकृती केंद्रांवर श्रीगणरायाच्या 7878 मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले.
महानगरपालिकेच्या वतीने मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेत दीड दिवसाचा विसर्जन सोहळा शांततेने पार पडला.
मिरा-भाईंदर शहरात दीड दिवसांच्या विसर्जन प्रसंगी एकूण 7878 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
प्रभाग क्रमांक १ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 302 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
प्रभाग क्रमांक २ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 796 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 1673 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 2738 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये कृत्रिम तलावात एकूण 82 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये नैसर्गिक तलावात एकूण 2287 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
अशाप्रकारे एकूण 7878 दीड दिवसीय श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार व आमदार गीता भरत जैन यांनी शहरातील ठराविक विसर्जन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. अग्निशमन सेवक, महानगरपालिका स्वयंसेवक यांच्यासह वैद्यकीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य सेवाही कार्यरत होते.
सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा तसेच सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती.
यापुढील काळातील श्रीगणेश विसर्जन अशाच प्रकारे सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी १ ते ६ प्रभाग समिती कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज असणार आहे.
तरी शहरातील सर्व नागरिकांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनास या पुढेही पुढील श्रीगणेश विसर्जन वेळेस सुध्दा पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.