Latest News आपलं शहर कोकण पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सिद्धेश राणे जिल्हाध्यक्ष तर ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष पदावर कुणाल काटकर विजयी!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीत पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, सेक्रेटरी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.

मुळात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा युवक काँग्रेसच्या सर्वच पदांकरिता ही निवडणूक घेण्यात आली असली तरी पक्षांतर्गत वाद पेटू नये म्हणून युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल मात्र अद्यापही गुलस्त्यातच ठेवण्यात आलेला आहे.

या निवडणूक प्रक्रिये अंतर्गत मिरा भाईंदर शहरातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन तसेच मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पार पडलेल्या निवडणुकीत मिरा-भाईंदर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सिद्धेश प्रकाश राणे यांनी 3509 मतं मिळवून 3472 मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवला तर ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष म्हणून कुणाल काटकर यांनी एकूण 2289 मतं मिळवून 1756 च्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला.

या निवडणुकीच्या माध्यमातून दोन सर्वसामान्य घरातील युवकांना मिरा-भाईंदर शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगत या दोघांनीही आपल्या विजयाचे श्रेय माजी आमदार मुझफ्फर हुसैन, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत व संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीला दिले आहे.

मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष पदावर सिद्धेश राणे आणि ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष पदावर कुणाल काटकर यांची निवड झाल्यामुळे शहरातील काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या दोघांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या उज्वल राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“सदर निवडणुकीत मतदारसंघातील व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या मोलाच्या साथीमुळे, घेतलेल्या परिश्रमांमुळेच हा विजय आपल्याला बहुमताने मिळवता आला आणि म्हणूनच हा विजय आज आपण साजरा करत आहोत, खरंतर हा विजय फक्त माझाच नसून मतदारसंघातील, शहरातील काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आणि सर्व युवा मतदारांचा आहे, तसेच निवडणूकीच्या सुरवातीपासूनच सर्वांकडून मिळालेल्या सहकार्य, प्रेम आणि आशीर्वादासाठी मी संपूर्ण काँग्रेस परिवाराचा कायम ऋणी आणि कृतज्ञ आहे” – कुणाल काटकर (युवक काँग्रेस अध्यक्ष, ओवळा-माजिवडा विधानसभा)

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *