संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कुख्यात गुंड आणि तस्कर तसेच मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार तसेच प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम सध्या भारताबाहेर आश्रय घेऊन आहे तरी त्याचे हस्तक व या गँगशी संबंधित गुंड सध्याही भारतात सक्रिय आहेत. अशाच गुंडांवर धडक कारवाई करत त्यांना अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर व्यक्तींना खंडणी प्रकरणी अटक झाल्याचे समजते, दाऊदचा हस्तक छोटा शकील तसेच रियाज भाटीला अटक केल्यानंतरची ही मोठी कारवाई समजण्यात येते. यावेळी मुंबई गुन्हे शाखेने एकूण पाच व्यक्तींना अटक केली असून त्यांची नावे पापा पठाण, अमजद रेडकर, फिरोज लेदर, अजय गंडा, समीर खान अशी आहेत.
अटक केलेले सर्व गुंड हे सराईत खंडणीबहाद्दर असून वर्सोवा येथील एका व्यावसायिकाची त्यांनी ३० लाखाची कार तसेच साडेसात लाख रुपयाची रोकड लुटत खंडणी वसूल केली होती. पोलिसांनी खाक्या दाखवताच चौकशीतून सर्व माहिती पुढे आली आहे, सध्या चौकशी सुरु असून आणखी महत्वपूर्ण माहिती या पाच गुन्हेगारांकडून प्राप्त होण्याची शक्यता आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.