Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज: भाजपचे १२ आमदार एक वर्षासाठी निलंबित..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार गदारोळ व राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरु असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण १२ सदस्यांचं निलंबन करण्यात आलंय.

१) गिरिश महाजन
२) संजय कुटे
३) अभिमन्यु पवार
४) आशिष शेलार
५) पराग आळवणी
६) योगेश सागर
७) राम सातपुते
८) नारायण कुचे
९) अतुल भातखळकर
१०) बंटी भागडिया
११) हरिष पिंपळे
१२) जयकुमार रावल

या १२ आमदारांना या वर्षभरात मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामील होण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हि माहिती आज विधानसभेत दिली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दुःस्वासही झालेल्या लज्जास्पद घटनेनंतर अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मजूरही करण्यात आला.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *