संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर नेत्यांवर आरोपसत्र सुरू झालं. मुंबईतील महाकाली गुंफेमध्ये शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे.
महाकाली गुंफेसाठी ५०० कोटी रुपये अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका या बिल्डरला दिले. उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये डावा हात अनिल परब यांचे रिसॉर्ट तुटणार आहे, तर तिसरा हात वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. अशी टीका सोमय्यांनी केली. १९९३ च्या ब्लास्टमधील अतिरेक्याचे स्मारक करण्यात हे व्यस्त आहेत. एकाबाजूला स्वतःच्या भ्रष्टाचाराचे स्मारक करायचे आहे, तर दुसऱ्या बाजूला याकूबचे स्मारक देखील करत आहे.
ईश्वर साकडे आणि नरेश सराफ हे १९९३ चे पीडित आहेत. नरेश सराफ यांचा उजवा पाय गेला. आज ३० वर्ष झालेत. हे याकूबचे स्मारक बांधायला निघालेत. तर ईश्वर साकडे यांना गोळी लागली. उद्धव ठाकरे हे बघणार का ? पालिका हे बघणार का ? असा सवालही सोमय्यांनी यावेळी बोलताना केला आहे.