संपादक: मोईन सय्यद/मुंबई, प्रतिनिधी
नवी मुंबई: जेष्ठ पत्रकार व संपादक बाळकृष्ण कासार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली.
बाळकृष्ण कासार हे पत्रकारितेतील एक उत्तुंग शिखरावर पोहोचलेले जेष्ठ पत्रकार आणि लोक निर्माण वृत्तपत्राचे संपादक आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत त्यांचे वृत्तपत्र वितरित होत असते. त्याना अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेकडून त्यांना नवीमुंबई जिल्हा अध्यक्ष पदी निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, विश्वस्त गणेश कोळी, केंद्रीय खजिनदार सत्यवान विचारे यांच्या हस्ते पनवेल मधील शासकीय विश्रामगृहात देण्यात आले.
संपादक बाळकृष्ण कासार यांच्या निवडीने नवीमुंबई या विकसित होत असलेल्या जिल्ह्याला एक पत्रकारितेतील कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष मिळाल्यांने त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदनासहित शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.